(धरमशाला)
भारताने न्यूझीलंडला ५ विकेट्स राखून पराभव करत भारताने यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये २०१९ च्या पराभवाचा वचपा काढळा. त्याचबरोबर भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विश्वचषक 2023 च्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला.आता भारताचे 10 गुण झाले आहेत.
टीम इंडियाने या विजयासह वनडे वर्ल्ड कपमधील न्यझीलंड विरुद्धचा इतिहास बदलला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा विजय हा 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये मिळवला होता.
न्यूझीलंडचे २७४ धावांचे आव्हान पार करताना विराट कोहलीने आपले वनडे कारकिर्दीतले ४९ वे शतक पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र शतकासाठी आणि विजयासाठी ५ धावांची गरज असताना विराट झेलबाद झाला. विराटला साथ देणा-या विराटने नाबाद ३९ धावा केल्या. वर्ल्डकप २०२३ च्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात डॅरेल मिचेलच्या शतकी खेळीच्या जोरावर किवींनी २७३ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून मोहम्मद शमीने ५ विकेट्स घेत आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्र्रने देखील ७५ धावांचे योगदान दिले. तर भारताकडून कुलदीप यादवने २ तर सिराज आणि बुमराहने प्रत्येकी १ विकेट घेतली.
शमीच्या नावे दोन विक्रमांची नोंद…
भारताकडून मोहम्मद शमीनं या सामन्यात सर्वाधिक 5 गडी बाद करत दोन विक्रमाची नोंद केली आहे. नवव्या षटकात मोहम्मद शमीला रोहित शर्माने गोलंदाजीसाठी पाचारण केले. शमीने या विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने किवी सलामीवीर विल यंगला क्लीन बोल्ड केले व भारताला दुसरे यश मिळवून दिले. यंग 27 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. या विकेटसह शमीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकाच्या इतिहासात शमीची ही 32वी विकेट आहे. यासह शमीने अनिल कुंबळेचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच सामन्यात 5 गडी बाद करताना 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. शमीने या प्रकरणात अनिल कुंबळेला मागे टाकले. यासह मोहम्मद शमी 50 षटकांच्या विश्वचषकात दोनदा पाच विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, आशिष नेहरा रॉबिन सिंग आणि युवराज सिंग यांना एकसाथ मागं टाकले आहे. या सर्व गोलंदाजांनी विश्वचषकात एकदाच पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकात शमीने इंग्लंडविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.