(नवी दिल्ली)
भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ च्या सेमी फायनलमध्ये जपानचा ५ -० अशा मोठ्या गोलफरकाने पराभव करत दिमाखात फायनल गाठली. आता फायनलमध्ये भारताचा सामना हा मलेशियासोबत आज (दि.१२) होणार आहे.
भारताकडून आकाशदीप सिंह, हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंह, सुमित आणि सेल्वम कार्ती यांनी गोल केले. भारतासाठी सामन्याचा दुसरा क्वार्टर हा धमाकेदार ठरला. भारताने या क्वार्टरमध्ये तब्बल 3 गोल केले.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि जपान यांच्यातील सेमी फायनल सामना हा भारतासाठी तसा आव्हानात्मक सामना होता. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये जपानने भारतीय हॉकी संघाने आक्रमण चांगल्या पद्धतीने थोपवून धरले होते. भारताला या क्वार्टरमध्ये गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या होत्या. मात्र जपानने चांगला बचाव करत आपली गोलपोस्ट भारतीय आक्रमणापासून वाचवली.