(चिपळूण)
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण तर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत गटसमूह चर्चा आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहीते यांनी भात पिकावर येणाऱ्या कीड आणि रोग, त्यांच्या नुकसानीचे स्वरुप तसेच त्यांचा बंदोबस्त कोणत्या प्रकारे करायचा याविषयी स्लाइड शोच्या आधारे शेतकरी बंधूंना माहीती दिली आणि एकात्मिक कीड आणि रोग पद्धतीचा वापर कसा करावा याबद्दल शेतकरी बंधूंना माहीती सांगितली. कार्यक्रमाअंतर्गत शंका समाधान कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उपाय योजना कशी करावी ह्या बद्दल समाधानकारक चर्चा करण्यात आली .
या कार्यक्रमासाठी बाळाराम घाणेकर (श्री देव नेटकेश्वर मंदीर ट्रस्ट उपाध्यक्ष), संदिप खांबे (सचिव), बारकू खांबे (पोलीस पाटील) व इतर ग्रामस्थ ही मंडळी उपस्थित होती. या मंडळीच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. अशा प्रकारचे कार्यक्रम घडवून महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वेळोवेळी माहिती सांगावी असे शेतकरी बंधूंनी सुचविले. कार्यक्रमास शेतकरी बंधूंची उपस्थिती पाहून RAWE च्या विद्यार्थीनींनी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमासाठी प्रा. बोकडे व मृदा गटाचे सहकार्य लाभले.