(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील भाट्ये बिच आणि अनुष्का बियर शॉपीच्या बाजुला मद्यपान करण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार करण्यात आली आहे.
अजिंक्य अंकुश शिवगण आणि सर्फराज अहमद शाह अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी शहर पोलिसांचे पथक शहरात गस्त घालत होते. त्यवेळी त्यांना भाट्ये बिच येथिल स्मशानभूमीजवळ उघड्या जागेत आणि अनुष्का बियर शॉपीच्या बाजुला असलेल्या चर्चजवळ हे दोघे सार्वजनिक ठिकाणी समोर दारुच्या बाटल्या व ग्लास घेऊन बसलेले आढळले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.