(सांगली)
‘भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा, १ लाख रुपये मिळवा’, असे लिहिलेले बॅनर सांगलीत झळकले आहेत. केंद्र सरकारकडून ईडीचा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांना काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस पाठवली आहे. आयएल अँड एफएस: प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. त्याचा निषेध म्हणून जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे डिजिटल फलक लावले आहेत. भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि १ लाख रुपये बक्षीस मिळवा’, असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे हे डिजिटल बोर्ड लावले आहेत. भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा, असा मजकूर या बॅनरवर लिहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा “जाहीर निषेध” चा डिजिटल बोर्ड लावला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.