(मुंबई)
भाजप कोकण विकास आघाडी मुंबई उपाध्यक्षा सौ. श्रावणी पारकर यांचे वडिल रमेश गंगाराम सावंत यांचे निधन झाले आहे. भांडुप पश्चिम येथे रमेश गंगाधर सावंत यांचे सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी वयाच्या ७६ व्यां वर्षी तुळशीत पाडा भांडुप पश्चिम येथे आपल्या रहात्या घरी आकस्मित निधन झाले. त्यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंड मॅनेजर पदावर काम केले होते.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी संगीता, दोन मुलगे विश्वनाथ, अमित, चार मुली श्रद्धा महामुनकर, सुवर्णा शेट्टयगर,श्यली दळवी आणि भाजप कोकण विकास आघाडी मुंबई उपाध्यक्षा श्रावणी मिलिंद पारकर आणि जावई, तसेच त्यांना सुधाकर,नंदकुमार, मनोज,महेंद्र असे चार भाऊ, सूनबाई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचं भांडुप येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी असंख्य मित्रपरिवार नातेवाईक आणि विभागातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.