(गुहागर/प्रतिनिधी)
सामाजिक सेवेत नेहमीच अग्रेसर असणारे समाजसेवक भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोरवेल दिली आहे. या बोरवेलचे उदघाटन मोठया दिमाखात नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, जिल्हा उपाध्यक्ष किरण खेरे, भाजपा पदाधिकारी संजय मालप, मनोज डाफले, किरण वैद्य, संजय आरेकर, कुंभार वाडी मुंबई अध्यक्ष श्रीरंग नरवणकर,अंकुश नरवणकर, सचिन पालकर, रवींद्र नरवणकर, स्थानिक अध्यक्ष शंकर शिरकर, उपाध्यक्ष उत्तम नरवणकर, सचिव चंद्रकांत दहिवलकर, सदस्य राजेंद्र दहिवलकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुहासनी पडवेकर आणि वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्यासाठी तयार आहोत, असे कुंभार वाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यांचा प्रवेश लवकरच माजी आमदार श्री विनय नातू यांच्या उपस्थित होणार असल्याचे भाजपा तर्फे सांगण्यात आले.