(नवी दिल्ली)
भाजपचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे सोमवारी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची मूत्रपिंड निकामी झाले होते. गेल्या १२ दिवसांपासून ते दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत होते. त्रास वाढल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते आजारी असल्याची माहिती मोजक्याच लोकांनाच होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. आग्रा येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुबे हे आग्रा कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. २०२० मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले.