(लांजा)
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक रमेश कीर यांनी विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सत्कार समारंभ प्रसंगी केले.
भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था भांबेड संचलित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेड मधील दहावी सेमी व मराठी, बारावी कला व वाणिज्य, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी संस्था अध्यक्ष ॲड सदानंद गांगण, सचिव संदीप जाधव, सहसचिव प्रकाश दैत, खजिनदार अविनाश गुरव, स्कूल कमिटी चेअरमन गोपीनाथ पवार, संचालक रविंद्र गांगण, बळीराम धडम, दत्ताराम धनावडे, टी. पी. मोरे, अनंत गुरव, रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते आश्पाक काद्री, मुख्याध्यापक आय. सी. मुलाणी, जेष्ठ शिक्षक प्रा. जयराज मांडवकर, माजी सरपंच श्वेता गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वन, संस्थापक स्व. शिवरामभाऊ ठाकूरदेसाई यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर पाहुण्यांचे ईशस्तवण व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी दहावी सेमी माध्यम तालुक्यात तिसरा, तालुक्यात विज्ञान विषयात व विद्यालयात प्रथम शुभम दळवी, द्वितीय हर्षिता चव्हाण, तृतीय श्रद्धा खापरे, दहावी मराठी माध्यम प्रथम धनेश शिवगण, प्रथमेश गुरव, तृतीय तनवीर बोबडे , बारावी कला शाखा प्रथम अस्मिता मोसमकर, व्दितीय साक्षी दैत, तृतीय मुक्ताई शेवाळे, बारावी वाणिज्य शाखा प्रथम तेजस गोसावी, व्दितीय उदय डोंगरे, तृतीय अक्षदा इंदुलकर, केंद्र सरकार मार्फत घेण्यात येणाऱ्या एन. एम. एम. एस. या परीक्षेत ६०,००० रु. शिष्यवृत्ती प्राप्त शौर्या जाधव, पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त आराध्या देसाई, हर्षदा बावधणे, आठवी शिष्यवृत्ती प्राप्त सार्थक गांधी, सनद शिंगये यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय पाटील व आभार प्रदर्शन संस्था सचिव संदीप जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, भांबेड चे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.