(देवरूख / सुरेश सप्रे)
भष्ट्राचारांचा पोशिंदा व सामान्यांचा कोशिंदा असणार्या भाजपाला दिल्लीच्या तक्तावरून बाजूला करत लोकशाही टिकवत आंबेडकरांनी लिहलेले संविधानतचे संरक्षण करणेसाठी शिवशक्ती व भिमशक्ती एकत्र आली आहे, हे लक्षात ठेवू काम करा असे आवाहन नवनिर्वाचित सेनेत नेते खा. विनायक राऊत यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील विविध गावातील असंख्य बौद्ध बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला खा. राऊत यांचेसह माजी मंत्री रवींद्र माने, माजी आम सुभाष बने सह संपर्क प्रमुख राजू महाडीक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, महिला नेत्या सौ. नेहा माने, सौ. वेदा फडके तालुका प्रमुख बंड्या बोरूकर, युवा अधिकारी तेजस शिंदे, चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख रोहन बने आदी मान्यवर या प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.
शिवसेना हा राजकीय पक्ष नाही तर तो परिवार आहे.. बाळासाहेबांनी कधी हि जात पात मानत नव्हते..राजकारण
करताना जातीभेद न करता सामाजिक कामाला महत्व देणारा कार्यकर्ते निर्माण केले म्हणूनच सेनेने खुल्या जागेवर अनेक जाती धर्माच्या लोकांना संधी देत मोठे केले. हे फक्त सेनेत घडते हा इतिहास आहे. हे लक्षात घेवून पक्षाचे काम करून जातीय वादाला खतपाणी घालत समाजात समाजात तेढ निर्माण करणात तरबेज असणार्या जातीयवादी भाजपाला हद्द पार करत त्याची जागा दाखवा असे प्रतिपादन खास. राऊत यांनी पक्ष प्रवेशावेळी मार्दशन करताना केले.
बौद्ध धर्माचा असूनजी मला ओपनमधून पं. स. सदस्य बनविण्याचे काम फक्त शिवसेनाच करू शकते. जातीपातीच राजकारण न करता सर्व समाजाला बरोबर घेणारा एकच पक्ष हि शिवसेनाच, हे लक्षात घेवून शिवशक्ती व भिमशक्तीेने एकत्र येत आगामी निवडणुकीत पुन्हा सेनेचे सचिव खास. विनायक राऊत यांना निवडून देणेसाठी कटिबद्ध होवू या, असे प्रतिपादन बौद्ध समाजाचे नेते माजी पं. स. सदस्य संजय कांबळे यानी केले.
बौद्ध समाजाच्या बांधवाना शिवसेनेत प्रवेशासाठी युवा नेते व विधानसभा क्षेत्र प्रमुख रोहन बने, जिल्हा प्रमुख विलास चाळके व बौद्ध समाजाचे नेते सेनेचे माजी पं. स. सदस्य संजय कांबळे यानी विषेश प्रयत्न केले. यावेळी तालुक्यातील सुमारे ५० बौद्ध बांधवांनी सेनेत प्रवेश केला..
यावेळी खास विनायक राऊत यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड झालेबद्दल शिवसेना संगमेश्वर तालुक्याच्यावतीने माजी मंत्री रवींद्र माने, माजी आम. सुभाष बने, जिल्हा प्रमुख विलास चाळके यांचे हस्ते सत्कार करणेत आला.