(चिपळूण)
चिपळूण शहरानजीक शंकरवाडी येथील लोकवस्तीमध्ये (दि ०३) रोजी पहाटे ३.०० च्या सुमारास १२ फुटी अजस्त्र मगर भरवस्तीत शिरली. ग्रामस्थांनी तीला पाहिल्यानंतर मात्र पाचावरण धारण बसली. यावेळी एकच गोंधळ उडाला. लगेचच याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने मगर पिंजऱ्यात बंदिस्त करून तिला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त केली आहे.
रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण राजश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सुर्वे, वनरक्षक,रामदास खोत, वनपाल व नंदू कदम, वाहनचालक यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
बंदिस्त करण्यात आलेली मगर १२ फूट लांब व अंदाजे ३०० किलोग्रॅम वजनाची असून ती मादी जातीची होती, तिचे वय अंदाजे ३४-४० वर्षे असावे, असे वन विभागाचे रेस्क्यू पथकाने सांगितले आहे. वन विभागाने दाखविलेल्या कार्यतत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांनी वन विभागाचे व रेस्क्यू पथकामधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.