(खेड / भरत निकम)
भरणे येथील तीन गावठी हातभट्टी विक्रीच्या दारुधंद्यांवर खेड पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. तिघांनाही अटक केली आहे.
खेड तालुक्यातील मौजे भरणे एसटी थांब्याच्या पाठीमागे उभारलेल्या खोपटीत अशोक हरिश्चंद्र घडशी (५४, रा. भरणे घडशीवाडी) याच्याकडे दोनशे रुपये रोख आणि ९६० किंमतीची दारु मिळाली आहे. हाॅटेल सन्मानच्या पाठीमागे निकेत नारायण हंबीर (३३, रा. कळंबणी,ता.खेड) याचेकडे ३५ लीटर क्षमतेच्या कॅनमध्ये १ हजार ६१० रुपये किंमतीची दारु तर चोरद नदीकाठच्या पुलाखाली अरुण नारायण शिगवण (४२, रा. सुकिवली,ता.खेड) याच्याजवळ १० लीटर कॅनात ५६० रुपये किंमतीची दारु सापडली आहे. तीनही ठिकाणी गेली अनेक वर्षे गावठी दारुची विक्री केली जात आहे. तिघांवरही दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे.