(खेड / भरत निकम)
खेड, दापोली व मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन भरणे घडशीवाडी येथील अनेक तरुणांनी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख सचिन धाडवे, भरणे ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे, विभाग प्रमुख प्रशांत चव्हाण, शाखाप्रमुख आदीत्य शिगवण आदी उपस्थित होते.
फोटो : रामदासभाई कदम यांनी तरुणांचे पक्षात स्वागत करताना दिसत आहेत