(संगलट-खेड/इक्बाल जमादार )
खेड तालुक्यातील भरणे गावाजवळील काशिमठ नजिक उधळे येथून येणारी ओढणी न्. एमएच 01 v 6501 यावरील चालकाने हुलकावणी दिल्याने वुड घेणा-या मालवाहतूक ट्रक नंबर एमएच 08 G 0731 वरील चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणा-या दुचाकी नंबर एमएच 08AC 5262 दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तळे गावचे ग्रामस्थ विजय पांडुरंग मोरे (वय 51 रा. तळे) त्याची पत्नी उर्मिला विजय मोरे (वय 50 रा तळे) ही गंभीर जखमी झाली. जखमी पत्नीला अधिक उपचारार्थ डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 13 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडला. दोन्ही जखमींना कळबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ 108 व शिवसेनेच्या रूग्णवाहीकेने दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी पत्नी उर्मिला विजय मोरे यांना डेरवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हिंगे करीत आहेत.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीवरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून खेडहून मुंबईच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक नंबर एमएच 08-0731 हा भरणे येथील काशिमठ जवळ उधळे येथून खेडला येणारी मारूती ओमनी कार नंबर एमएच 01V 6505 वरील चालकाने समोरून येणारा मालवाहतूक ट्रक नंबर एमएच 08 G 0731 वरील चालकाने अचानक ब्रेक केल्याने पाठीमागून येणारी दुचाकी नंबर एमएच AC 5262 वरील चालकाने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने अपघात घडला. आज दिवसभरात झालेल्या दोन अपघातात 2 ठार 4 जखमी झाल्याची घटना घडली. दोन्ही अपघाताची नोंद येथील पोलीसात करण्यात आली आहे.