(सुरेश सप्रे / देवरूख)
बेळगांव येथील नँशनल रुलर डेव्हलपमेंट फौंडेशन व हेल्थ अँण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांचे तर्फे कर्नाटक. महाराष्ट्र. व गोवा या राज्यातील सामाजिक, शैक्षणीक, सहकार, बांधकाम, आरोग्य आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
साखरपा विभागातील शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते व भडकंबा सरपंच प्रशांत उर्फ बापू शिंदे यांना हा प्रतिष्ठेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा ८ऑक्टोबरला बेळगाव येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
बापू शिंदे हे अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. भडकंबा ग्रामपंचायत तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या भडकंबा येथील केदारलिंग देवस्थान नवरात्रोत्सव मंडळ, कोंडगाव ग्रुप वि.का.स. संस्था, व्यापारी मंडळ साखरपा (कोंडगाव), केदारलिंग दूध संस्था भडकंबा इ.अनेक संस्थेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहेत. भडकंबा गावासह साखरपा विभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
भडकंबा गावामध्ये विधवा विधी प्रथा बंदी करणे हे धाडसी काम त्यांनी केले.गावामध्ये रोजगार व उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आवश्यक असे दूध संकलन केंद्र निर्मिती करणे, व्यायामशाळा, वाचनालय इ.साधन निर्मिती करणे तसेच गावामधील कामगार, मजूर, निराधार व गरजू ग्रामस्थांना अनेक योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये व आवश्यक साधन सामग्री देखील त्यांचे माध्यमातून मिळाले आहेत. आरोग्य विषयक अनेक योजना व मदत विविध संस्था व ट्रस्टच्या माध्यमातून देखील ग्रामस्थांना मिळाली आहे. गावातील शालेय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणारे मुले -मुली व विविध शासकीय विभागातून निवृत्त होणारे इतर मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देखील केला जातो .यातील अनेक उपक्रम स्वखर्चातून बापू शिंदे हे गेली कित्येक वर्षे करत आहेत .
या कार्याची दखल घेउन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करणेत आली.या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले . या निवडीमुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचा गौरव होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.