(देवळे /प्रकाश चाळके)
साखरपानजिकच्या भडकंबा गावातील प्रसाद शिंदे यांची जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे. भडकंबा गावचे रहिवाशी सुरेश उर्फ आण्णा शिंदे यांचा सुपुत्र प्रसाद शिंदे याची निवड वीस वर्षाखालील जिल्हा कब्बडी संघात झाली आहे. प्रसाद शिंदे गेली 7 ते 8 वर्षे कब्बडी खेळत असून वडील सुरेश शिंदे यांचेकडून प्रसादने कब्बडीचे धडे घेतले.
प्रसाद उत्कृष्ठ चढाई व पकड यामध्ये पारंगत असून बैलगाडा शर्यत व भात नांगरणी स्पर्धेत देखील उत्तम जाखीची भूमिका पार पाडत असतो. त्याच्या या उत्तुंग यशामुळे भडकंबा गावच्या वतीनेव केदारलिंग देवस्थान समिती यांच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करणेत आला.
सदर सोहळ्याप्रसंगी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे, देवस्थान समितीचे सचिव गणपत शिर्के, गावकर संजय नवाले, विश्वस्त चंद्रकांत कनवजे, तं.मु. अध्यक्ष रविंद्र दुधाने, सुरेश शिंदे, राणू मोहिते, इंजि. सूचित कांबळे, शंकर शेठ नवाले, प्रदीप नवाले, विलास कनावजे व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसादच्या निवडीने परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.