(रत्नागिरी)
शहरातील भगवतीबंदर येथे अंमली पदार्थ (ब्राऊन हेरॉईन) विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई केली. या कारवाईत १० हजार २०० रुपयांचा ४ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिसात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थां विरोधात यापूर्वीही धडक कारवाई करून चांगली कामगिरी केली आहे. धडक कारवाईनंतर ही शहरात काही भागात अंमली पदार्थ (ब्राऊन हेरॉईन) विक्री छुप्या पद्धतीने चालू असल्याचे अशा कारवाई मधून समोर येत आहे. पोलिसांनी भगवती बंदर येथे केलेल्या कारवाईत महम्मद ताहीर इब्राहिम मस्तान (वय ३४) व रूखसार ताहीर मस्तान (वय २८, दोघेही रा. वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी अल्ट्राटेक कंपनीचे भगवतीबंदर येथील डंपिंग प्लॉटच्या पुढील ब्रेकवॉटरकडे रस्त्यावर मोबाईल टॉवरजवळ निदर्शनास आली.