(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर बौद्धवाडी येथील प्रज्ञा बुद्धविहारात नुकताच वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी संस्कार समितीचे बौद्धाचार्य तथा श्रामणेर संदीप जाधव यांनी उपस्थित धम्म बंधूभगिनींना आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून विशेष धम्मप्रवचन दिले. या धम्म प्रवचनातून त्यांनी उपस्थितांना विपश्यना, धम्म आचरण व सध्याची धार्मिक, सामाजिक स्थिती याबाबत विविध उदाहरणे देऊन मौलिक मार्गदर्शन केले.
रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या विद्यमाने आणि बौद्धजन पंचायत समिती गावशाखा क्र.१९भगवतीनगर व तक्षशिला बौद्धजन मंडळ मुंबई- भगवतीनगर यांच्या विशेष नियोजन व आयोजनात वर्षावास हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या यशस्वी नियोजनात व उत्साहात प्रज्ञा बुद्धविहारात भगवतीनगर गावशाखेचे स्थानिक अध्यक्ष राजाराम जाधव यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे,चिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, तालुका शाखेचे माजी अध्यक्ष तु.गो.सावंत, माजी सैनिक तथा तालुका शाखा न्यायनिवाडा समितीचे सदस्य आर.डी.सावंत, संस्कार समिती चे सचिव रविकांत पवार, सदस्य विलास कांबळे, तालुका शाखा महिला मंडळाच्या अध्यक्षा तृप्ती कांबळे आदींसह स्थानिक भगवतीनगर शाखेचे अध्यक्ष राजाराम जाधव, उपाध्यक्ष राहुल जाधव, चिटणीस विश्वास जाधव, दत्ताराम जाधव, नारायण जाधव आदींसह आदर्श महिला मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भगवतीनगर तक्षशिला बौद्धजन मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष मिलिंद जाधव,उपाध्यक्ष जीवन जाधव,चिटणीस राजेंद्र जाधव,खजिनदार विजय जाधव, हि.तपासनीस महेंद्र जाधव, रविंद्र जाधव, माजी चिटणीस मंगेश जाधव,नरेश जाधव, विजय जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा जान्हवी जाधव, सचिव मानसी जाधव, सुषमा जाधव, रेखा जाधव, सुवर्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाला विविध गावशाखा व स्थानिक शाखेतील लहानथोर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्म ध्वजारोहण व प्रज्ञा बुद्धविहारात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना उपस्थित बौद्धाचार्य व श्रामणेर संघाच्यावतीने घेण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत भगवतीनगर स्थानिक गावशाखा व तक्षशिला बौद्धजन मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
त्यानंतर संदीप जाधव यांचे मौलिक धम्मप्रवचन व शेवटी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तालुका शाखेच्या कामकाज व विविधांगी उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच अध्यक्षीय मनोगतात राजाराम जाधव यांनी वर्षावास कार्यक्रम हा तालुका शाखेने देऊन धार्मिक प्रबोधन केल्याबद्दल विशेष गौरवोद्गार काढले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवतीनगर स्थानिक शाखेच्या व तक्षशिला बौद्धजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.