(नवी दिल्ली)
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे अडचणीत आलेले ब्रिजभूषण सिंह यांनी आता आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. आपण स्वतः कैसरगंज मतदारसंघातून लढणार आहोत, असं म्हणत त्यांनी स्वतःची उमेदवारीच जाहीर करून टाकली आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने भाजपा नेतृत्वाला आव्हान दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Will contest 2024 Lok Sabha polls from Kaiserganj constituency, says Brij Bhushan
Read @ANI Story | https://t.co/z8sZI6lkpA#BrijBhushan #Kaiserganj #LokSabhaPolls pic.twitter.com/cO02k146z6
— ANI Digital (@ani_digital) June 11, 2023
भाजपने अद्याप 2024 च्या लोकसभेसाठी कुणाचीही उमेदवारी जाहीर केली नसताना ब्रिजभूषण सिंह यांनी थेट स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी केलेल्या या घोषणेबाबत भाजपकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आगामी काळात भाजपचे हायकमांड ब्रिजभूषण सिंह यांच्या या घोषणेबद्दल काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.