(रत्नागिरी)
बोटीवर काम करणारा खलाशी कुणालाही काही न सांगता निघून गेला होता. शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती; मात्र सोमवारी फिशिंग करणाऱ्या एका बोटीला एकजण पाण्यात तरंगताना दिसला. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
रमतकुमार धनीराम चौधरी (क्य २४, मुळ : कैलाली नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा बोटीवर, रत्नागिरी) असे मृत खलाशी तरुणाचे नाव आहे. हि घटना शनिवारी (ता. २३) मिरकरवाडा येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमतकुमार हा मच्छीमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता; मात्र शनिवारी कुणालाही न सांगता तो निघून गेला होता.
याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती; मात्र सोमवारी (ता. २५) सायंकाळी ६ वाजता ब्रेकवॉटर येथे फिशिंग करणाऱ्या एका बोटीला एक अज्ञात व्यक्ती तरंगताना दिसली. त्या व्यक्तीला बोटांतून मिरकरवाडा येथे घेऊन आले असता तो रमतकुमार चौधरी असल्याचे समजले, त्याला जिल्हा शासकीय ररुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.