(पुणे)
पुणे शहरात नुकतेच दोन दशतवादी पकडले गेले आहेत. एनआयएच्या लिस्टमधील दहशवादी पुणे शहरात दीड वर्षांपासून राहत होते. जयपूरमधील सीरियल ब्लास्ट करण्याचा कटामधील ते आरोपी होते. त्यांच्या नावावर पाच लाखांचे बक्षीस होते. पुणे पोलिसांनी या दोघांना पकडल्यानंतर तपास पुणे एटीएसकडे दिला आहे. त्यानंतर या दोघांना मदत करणाऱ्या आणि त्यांना घर भाड्याने देणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एटीएसने त्यांच्या फ्लॅटवरुन बॉम्ब बनवण्याचे सर्किट, केमिकल जप्त केले असून मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
एटीएसला या फ्लॅटवर बॉम्ब निर्मितीचे सर्किट मिळाला आहे. या दहशतवाद्यांनी बॉम्बची चाचणी जंगलांमध्ये केली होती. काही रसायनसुद्धा त्यांच्या फ्लॅटमध्ये मिळाले. रासायनिक पावडर, चारकोल, थर्मामीटर, ड्रॉपर, सोल्डरिंग गन, मल्टीमीटर, छोटे बल्ब, बॅटरी, अलार्म घड्याळ आणि मोटरसायकल चोरीसाठी वापरण्यात येणारे स्पॅनर या ठिकाणी मिळाले आहे.
पुणे पोलिसांनी इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना अटक केली आहे. परंतु त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज (वय ३२) फरार झाला. आता हे राहत असलेल्या ठिकाणी एटीएसने कारवाई केली आहे. एटीएसला त्यांच्या फ्लॅटमधून ५०० जीबी डेटा मिळाला आहे. त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. हा ५०० जीबी डाटा एफएसएलकडे पाठवण्यात आला आहे.