(रत्नागिरी)
संगमेश्वरहून रत्नागिरीत आलेला प्रौढ आठवडा बाजार येथे एका लॉजच्या शेजारी बेशुद्ध अवस्थेत सापडला. उपचारासाठी त्याला नातेवाइकांनी व पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
किशोरी धारसु कहार (वय ४०, सध्या रा. डिंगणी, ता. संगमेश्वर. मूळ -छंदवाडा, मध्यप्रदेश) असे मृत प्रौढाचा नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ५) सकाळी आठच्या सुमारास आठवडा बाजार येथील एका लॉजजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी कहार हा संमेश्वरहून रत्नागिरी दाखल झाला होता. शुक्रवारी आठ वाजण्यापूर्वी बेशुद्ध अवस्थेत संगीता लॉजजवळ सापडला. तत्काळ त्याला नातेवाईक व पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.