(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मारहाण प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर जेलरोड ते हातखंबा जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर गाड्यांचे हेड लाईट व इंडीकेटर लावून हॉर्न वाजवत संशयितांनी कार आणि दुचाकींवर धोकायदायक स्थितीत बसून मोठ्याने किंचाळून दहशत निर्माण होईल असे वातावरण निर्माण करुन रहदारीला अडथळा करुन रॅली काढणाऱ्या १२ जणांची न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. ही घटना २१ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६ वा. घडली. होती.
महेश ऊर्फ बाबू म्हाप (४५), सागर मापुसकर (३३), केदार देसाई (४०), परशुराम कदम (३८), मोरेश्वर कासारे (३२), सचिन शेट्ये (४३), शिवानंद जटार (४२), ऋषीकेश तोडणकर (३७), करण सनगरे (२२), ऋषीकेश गावडे (२२, सर्व रा. हातखंबा, रत्नागिरी), अरुण झोरे (३८, रा. टी. आरपी, रत्नागिरी) आणि संतोष रजपुत (३२, रा. पानवल, रत्नागिरी) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या १२ जणांची नावे आहेत. मारहाण प्रकरणात या १२ जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
याप्रकरणात न्यायालयाने त्यांची २१ ऑगस्ट २०१९ रोजी निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांनी जेलरोड ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे रॅली काढली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करुन बेकायदेशीर जमाव करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात संशयितांच्या वतीने ॲड. मच्छिंद्र आंब्रे व ॲड. सुनिता आंब्रे यांनी काम पाहिले असून याप्रकरणी बुधवारी निकाल देताना सह दिवाणी न्यायाधिश एम. आर. सातव यांनी सर्व १२ जणांची निर्दोष मुक्तता केली.