(मुंबई)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय समिती (बीआरएस) ने अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात एण्ट्री घेतली आहे. रविवारी नांदेडमध्ये झालेल्या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी ‘अब की बार किसान सरकार’ असा नारा दिला. सोबतच देशात बीआरएसचे सरकार आल्यास मागासवर्गीयांना वार्षिक १० लाख रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच, परिवर्तनाची , हीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
नांदेड दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर राव यांनी नांदेडमधील गुरुद्वाराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय समितीचा प्लान जनतेसमोर मांडला आणि परिवर्तनाची हीच योग्य वेळ आहे, या वाक्याचा पुनरुच्चार करताना केंद्रावर टीका केली.