(पुणे)
सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये राजकीय पक्षप्रवेशाचे वारे वाहतात दिसत आहेत. अनेक अभिनेते, अभिनेत्री वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसतात.नुकताच अभिनेत्री, निर्माती आणि बिग बॉस मराठी सीजन एक ची विजेती धाकड गर्ल मेधा धाडे हिने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मात्र अभिनेत्री मेघा धाडेच्या भाजप पक्षप्रवेशानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मेधाच्या पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , महामंत्री विजय चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रियाबेर्डे आदींच्या उपस्थितीत मेधानं कमळ हाती घेतलं.
भाजप हा जगातील सर्वात शक्तिशाली पक्ष आहे अशी प्रतिक्रिया पक्षप्रवेशानंतर मेधाने दिली.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मेधाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत आणि फोटो शेअर करत,आपल्या भावना व्यक्त केल्या. ती लिहिते नमस्कार वंदे मातरम ! मला आपणास सगळ्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की , तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी माझा आवडता आणि जगातला सगळ्यात मोठा बलशाली पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला आहे.
मेघानं पुढे लिहिलंय, “समाजसेवेसाठी घेतलेल्या व्रताचे आता पुरेपूर पालन करायचे आहे. एका सुदृढ आणि सुशिक्षित सुसंस्कृत समाजाचं जे आपलं ध्येय आहे ते घेऊन आता जोमात कामाला लागायचा आहे , तेव्हा तुम्हा सगळ्यांचे ही आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत असू द्या हीच विनंती आणि अपेक्षा आहे. हे मी माझे अहोभाग्य समजते की काल ज्यांच्या उपस्थितीत माझी प्रवेश प्रक्रिया पार पडली ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत जी पाटील, महामंत्री श्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रियाताई बेर्डे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला.