(रत्नागिरी)
तालुक्यातील निवळी बावनदी पुलाच्या बांधकामावरुन रविवारी ७ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वा कामगारांच्या दोन गटात नदीच्या पात्रात तुफान राडा झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश मंडल आणि अन्य ७ अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इम्तीयाज आतम जलीम शेख (मुळ रा. बिहार सध्या रा. बावनदी पुलाजवळ, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी बावनदी पुलाचे पुर्वेकडील पिलरचे बांधकामाचे काम इगल आहे. कंपनीकडून घेतले यापूर्वी हे काम इगल कंपनीने मुकेश मंडलला दिले होते. परंतु, या कामात त्याच्याकडून विलंब होत असल्याने कंपनीने पुलाचे अर्धे काम इम्तीयाज शेखला दिले आहे. याचा राग मनात धरुन मुकेशने रविवारी रात्री शेखला लोखंडी पाईप व सळीने मारहाण केली.
दरम्यान इम्तियाज शेखचे कामगार रामबाबू कुशवाह, वशिम शेख, मोहम्मद शेख त्याला सोडवण्यासाठी मधे पडले असता मुकेशने त्यांनाही मारहाण करत गर्डरचे काम तुच करणार काय तु बिहारी इथून पळून जा नाहीतर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली.
या मारहाण प्रकरणात सोनु साधु रॉय (मूळ रा. उत्तराखंड सध्या रा. बावनदी पुलाजवळ, रत्नागिरी) यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार, डिसेंबर २०२३ रोजी निवळी बावनदी येथील रस्ता रुंदीकरणाचे पुलाच्या पिलचे काम त्यानीं इगल कंपनीकडून घेतले आहे. तर या पुलाच्या पलीकडील पिलरचे काम काही बिहारी लोकांनी घेतले आहे. रविवारी रात्री सोनु रॉय जेवण बनवत असताना त्यांना नदीपात्राच्या भागात जोरजोरात आरडा-ओरड व शिवीगाळ केल्याचा आवाज येउ लागला. तेव्हा त्यांच्या ग्रुपचे कामगार व नदी पलीकडील पुलाचे काम करणारे बिहारी ग्रुपचे कामगार एकमेकांना शिवीगाळ करुन लोखंडी शिग व पाईपने मारहाण करत होते.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कायदा कलम ३२४, ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास करीत आहे.