(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील निवळी बावनदी येथे अवैध जुगारावर अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जयेश बाबू कांबळे (४५, रा. पांगरी बौद्धवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवळी बावनदी येथे अवैधरित्या जुगार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी संशयित आरोपी हा अवैधरित्या जुगार चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्सटेबल सुनील सावंत यांनी तक्रार दाखल केली.