( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथील अवघड वळणावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला बुधवार 23 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाला होता. डाव्या बाजूला मातीच्या ढीगात ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा झाला नव्हता. मात्र ट्रकमधील माल रस्त्यावर येऊन पडला होता. ग्रामस्थांनी तो बाजूला केला. शनिवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने या ट्रकला अपघातग्रस्त ट्रकला बाजूला करण्यात आले.