(लखनऊ)
उत्तर प्रदेशमध्ये एका पुजाऱ्याने लहान बाळाला उकळत्या दुधाने आंघोळ घातल्याची भयंकर घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहे. एक पुजारी लहान बाळाला उकळत्या दुधाने अंघोळ घालत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. दुधाचे चटके लागत असल्याने बाळ तडफडत मोठ्याने रडत असतानाही कुणालाही पाझर फुटला नाही, पुजाऱ्याला कोणीही अडवताना दिसत नाही. सर्वांच्या समोर बाळावर उकळतं दूध टाकण्यात आलं पण तरी सर्वजण तिथं उभं राहून तमाशा पाहत राहिले. उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे.
बाळाला गरम दुधाने घातली अंघोळ, वाराणसीत पंडित अनिल भगतचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/ulIQCfxZW0
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) June 28, 2023
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका बाळाच्या उघड्या अंगावर मातीच्या भांड्यातील उकळत्या दुधाचा फेस काढून लावत आहे. यावेळी बाळ वेदनेनं व्हिवळत होतं, मात्र तरीही उपस्थित असलेल्यापैंकी कुणालाही बाळाची दया आली नाही. सगळे हा प्रकार फक्त बघत होते. लोकांचे म्हणणे आहे की, ही यादव समाजाची गोवर्धन पूजेची विधी आहे. ही खास पूजा पंडित अनिल यादव पार पाडतात. यामुळे घरात सुख-शांती येते व कुटूंबावरील संकट टळते, अअसा समज आहे.
बलिया जिल्ह्यातील श्रवणपूरमध्ये गोवर्धन पूजेच्या वेळी लहान बाळाला उकळत्या दुधाने अंघोळ घातल्याची ही घटना घडली आहे. यादव समाजात या गोवर्धन पूजेची पद्धत आहे. या पूजेमुळे घरात सुख-शांती येते व कुटुंबावरील संकट टळते, अशी इथल्या लोकांची भावना आहे. मात्र या पूजेवेळी लहान मुलासोबत केलेल्या कृत्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत. या पूजाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.