(रत्नागिरी)
नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था चिपळूण यांच्या संयुक्त विद्यामानाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात राष्ट्रीय जल मिशन (कॅच द रेन)जलसंवाद व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील, सौ.सुनीता वारंग, श्री. अमित आदावडे, अखिलेश कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास ८० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.जनशक्ती या विषयाची माहिती श्री.अमित आदावडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या चित्रकला स्पर्धेमध्ये पाण्याचे महत्व,जल संरक्षण हा मुख्य विषय होता चित्रकला स्पर्धेमध्ये 30 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
सदर स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक अक्षरा कुंभार, द्वितीय क्रमांक सलोनी विजय पवार, तृतीय क्रमांक ईश्वरी सुभाष गुरव यांनी पटकावला. या विद्यार्थ्याना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला शिक्षक श्री.तुकाराम पाटील व अखिलेश कांबळे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील, श्री.अमित आदावडे, सौ.स्वरा सावंत, सौ.भाग्यश्री निर्मळ, कु.शर्मिला म्हादे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनिता वारंग यांनी केले तर आभार सौ.स्नेहल भोसले यांनी मानले.