(पुणे)
बारावी परीक्षेत नापास झाल्याने निराश होऊन निखिल लक्ष्मण नाईक ( वय १९, रा. श्रवंधरा वसाहत) याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तो खिल गरवारे कॉलेजमध्ये कॉमर्सचे शिक्षण घेत होता.
बारावीचा निकाल ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याचे समजल्यावर त्याला निकालाबाबत खूप उत्सुकता होती. ऑनलाइन निकालपत्रिकेत नापास झाल्याचे समजताच दुपारी एकच्या सुमारास त्याने इमारतीच्या वरती उडी मारली. तो खाली उभ्या असलेल्या 30 वर्षीय शेखर लहू लोणेरे यांच्या अंगावर पडला, यामध्ये लोणेरे हे सुध्दा गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेत निखिलचा जागीच मृत्यू झाला. लोणेरे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.