(सोलापूर)
सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटनानी हादरून गेले. एका बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैवी घटना समोर आली. शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतःच्याच मुलांना कोल्ड ड्रिंक्स मध्ये विष घालून जीवे मारल्याचे दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे.
दिनांक १३/०१/२०२४ रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास, सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एका लहान मुलाचे मृतदेह मिळून आला होता. संबंधित माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होत. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू (वय- १४ वर्षे, राहणार भवानी पेठ सोलापूर) अशी पटली. आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनस्थळ पर्यंतचे सर्व फुटेज तपासले. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादी चे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने माहिती दिली की, आपला मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांसोबत सतत खोड्या करायचा व त्याचे शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरुन वरील वेळी व ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मोटार सायकलवर घेवून जावुन त्यास थम्सअप मध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजुन जिवे ठार मारल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.