(पुणे)
गेल्या काही दिवसापासून मराठी चित्रपट विश्वातं आपलं एक वेगळंच स्थान निर्माण करणारा, सैराट नंतर महाराष्ट्राचा महासिनेमा ठरलेला आणि लवकरच 100 कोटीच्या क्लबमध्ये जमा होणारा ‘बाई पण भारी देवा’ हा सिनेमा, महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांचा लोकप्रिय सिनेमा ठरतोय. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही सिनेमा पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली. हैद्राबादमध्येसुद्धा महिलांनी बाईपण भारी देवा ला डोक्यावर घेत थिएटर हाऊसफुल्ल केलं. नटून थटून नथ, गॉगल लावून मिरवणाऱ्या बाई पण भारी देवा या सिनेमाचा आस्वाद घेताना महिला दिसत आहेत. अशातच बाईपण भारी देवाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु झालीय.
बाई पण भारी देवा या सिनेमाची कथा पटकथा संगीत आणि त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या दिग्गज नायकांची या सगळ्यांमुळे गट्टी जमून आली. अनेक चित्रपटगृहात केवळ महिलांसाठीचे खास शो आयोजित करण्यात आले, तर या चित्रपटाच्या नावाने अनेक कार्यक्रमहि आयोजित होऊ लागले आहेत. आणि म
या सिनेमातील गाण्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर रील शेअर करण्यात आल्यात.
या सिनेमाचा दुसरा सिक्वेल येणार का? याबाबतही अनेकांच्या मनात शंका आहे. बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये बाईपण भारी देवा ची कथाकार वैशाली नाईक बाईपण.. साठी काम केलेला लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त पहायला मिळत आहेत.
“एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू… बाईपण भारी देवा नंतर… काहीतरी भारी…” असं कॅप्शन दिलंय. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिलीय. बाईपण भारी देवा सिनेमाच्या या टीमला पाहून अनेकांना सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झालीय, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.