(चिपळूण/प्रतिनिधी)
चिपळूण एस.टी. स्टॅण्ड वर बसमध्ये चढताना अज्ञात चोरटयाने गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या पर्समधील 86 हजार 250 रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना 31 मे रोजी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संतोषी सचिन कोळंबेकर (33, दापोली, सध्या रा. खेड) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळंबेकर या बसमध्ये चढत असताना चोरटयाने पर्समधील डबीमधून गर्दीचा फायदा घेऊन दागिने घेवून पोबारा केला. यामध्ये 60 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 26 हजार 250 रुपयांचे 8 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठया असा एकूण 86 हजार 250 रुपयांचा ऐवज लांबवला. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.