(रत्नागिरी/प्रतिनिधी)
बहुजन समाज पार्टी जळगावचे प्रदेश महासचिव रवींद्र गवई रत्नागिरी जिल्हा दौर्यावर येत आहेत. ओबीसी जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा बसपातर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजनही करण्यात येणार आहे. रविवार दि.19 जून रोजी रत्नागिरी एसटी स्टँडसमोरील जांभेकर विद्यालय येथे 11 ते 5 या वेळेत होणार्या या प्रशिक्षण शिबिरासाठी तमाम ओबीसींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तब्बल 52 टक्के असलेल्या 3743 जातीत विभागलेला ओबीसी समाज नेमका कोण? समाजव्यवस्थेत त्याचे महत्त्व आणि स्थान काय? याबरोबरच ओबीसी समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, नोकरशाही, जमीनदारी यामध्ये सद्यस्थितीत असलेली अवस्था व त्यांचा योग्य दर्जा या संदर्भात रवींद्र गवई मार्गदर्शन करणार आहेत. प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या या प्रशिक्षण शिबिरासाठी जिल्ह्यातील बसपाचे ज्येष्ठनेते अॅड.अशोक निकम हे देखील ओबीसींच्या संघर्षाची व्याप्ती व दिशा कशी असावी? याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
सध्या ओबीसींच्या जनगणनेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच यामध्ये बसपाने उडी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसींच्या सद्यस्थितीतील राजकीय जडणघडणीला छेद जातो की काय? अशी भितीदेखील प्रस्थापित राजकारण्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सदरच्या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत पवार-रत्नागिरी, सचिन मोहिते-चिपळूण, यासीन परकार-दापोली, जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे, उपाध्यक्ष प्रेमदास गमरे, महासचिव आनंदा कांबळे, कोषाध्यक्ष सखाराम पवार, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश जाधव, लांजा-राजापूर विधानसभा अध्यक्ष मिथुन कांबळे, दापोली विधानसभा अध्यक्ष अॅड.ज्ञानरत्न जाधव त्याचप्रमाणे गुहागर येथील उमेश पवार यांसह अनेक कार्यकर्ते अथक परिश्रमासह जुन्या-नव्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ओबीसींमध्ये जागृती निर्माण होईल असा विश्वास प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी व्यक्त केला आहे.