(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी शहरानजिकच्या बसणी येथील बसणी विविध कार्यकारी सरकारी सेवा सोसायटी गेली ५९ वर्षे कार्यरत आहे. सोसायटीचे माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचे कालावधीत कर्ज पुरवठा करत आली आहे.
बसणी विकास सोसायटीकडून विविध उपक्रमांतर्गत एक भाग म्हणून सोसायटीचे दिवंगत सभासदांचे कुटुंबातील सदस्याला मदतीचा हात देणे अविरत सुरूच आहे. ही सोसायटी १४,नोव्हेंबर २०२३ पासून हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. या सोसायटीतील ज्येष्ठ सभासद गोपाळ गोविंद नेवरेकर यांचे निधन झाले. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळाने तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांची पत्नी शुभांगी गोपाळ नेवरेकर यांचेकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. ही आर्थिक मदत सोसायटीचे चेअरमन जयवंत बापूराव कदम यांचे हस्ते देण्यात आली.
यावेळी सदस्या मिनल प्रशांत बंदरकर, सुहासिनी सुरेश बारगोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाचे सर्वसाधारण सभेपासून दुसर्या सभासदांचे कुटुंबीयांसह मदत देण्यात आली.