(खेड / भरत निकम)
बनावट स्वाक्षरी करून जमीन मिळकतीमधील हद्द कायम करण्यास नकाशामध्ये फेरबदल करण्याच्या इराद्याने फसवणूक केल्या प्रकरणी कळंबणी येथील पिता पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश दाजी वरेकर (रा.भोईवडा परेल) यांची कळंबणी वालांजवाडी येथे गट क्र. १६/५ब/१ या जमीन मिळकतीची अती तातडीची हद्दी कायम मोजणी केली होती. या जमीन मिळकतीचे क्षेत्रामध्ये व नकाशात फेरबदल करण्याच्या इराद्याने प्रकाश वरेकर यांची खोटी स्वाक्षरी करुन फसवणूक केल्या प्रकरणी मधुकर महादेव सकपाळ व अजिंक्य मधुकर सकपाळ यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.