(मुंबई)
बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणा-या टोळीतील एका आरोपीला मुंबई गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. खोट्या कागदपत्रांचा वापर करत आधारकार्ड बनवण्याचे काम अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून केले जात होते. गोरेगाव पोलिसांनी आरोपीच्या कार्यालयातून ३० हून अधिक बोगस आधार कार्ड आणि १५ बोगस पॅनकार्ड जप्त केले. यामागे आणखी काही आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी आरोपीच्या कार्यालयातून बोगस कागदपत्रांसह प्रिंटर, कॉम्प्युटर आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याशिवाय आरोपींकडून एकाच नावाने ५० हून अधिक आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवण्यात आले आल्याचेही यावेळी दिसून आले. यामध्ये बहुतांश कार्डे हिंदूच्या नावाने तर कागदपत्रे मुस्लिमांच्या नावावर असल्याचे आढळून आले. अशा प्रकारचे फेक आधारकार्ड तयार करण्यासाठी हा आरोपी ५० हजार रुपये घेत असल्याचे समोर आले आहे.