आयपीएल-16 मधील 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) 18 धावांनी हरवले. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा करत लखनऊला विजयासाठी 127 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना लखनऊला 19.5 षटकांत 10 गडी गमावून 108 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीने लखनौला नमवत पराभवाचा वचपा काढला. लखनौने बेंगलोरमध्ये आरसीबीचा अखेरच्या चेंडूवर पराभव केला होता. त्यानंतर काल आरसीबीने लखनौचा पराभव करत हिशोब चुकता केला.
१२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. काइल मेयर्स याला मोहम्मद सिराज याने शून्यावर तंबूत धाडले. त्यानंतर हेजलवूड याने आयुष बडोनी याला चार धावांवर तंबूत धाडले. आरसीबीच्या गोलंदाजांनी पावरप्लेमध्येच लखनौच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. लखनौचे आघाडीचे चार फलंदाज पावरप्लेमध्ये बाद झाले होते. मेयर्स आणि बडोनी बाद झाल्यानंतर कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डाही पावरप्लेमध्ये बाद झाले होते. दीपक हुड्डा एका धावेवर बाद झाला. तर कृणाल पांड्याने ११ चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. पावरप्लेमध्ये लखनौच्या संघाने चार विकेटच्या मोबदल्यात फक्त ३४ धावा केल्या हत्या.
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि स्टॉयनिस यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात निकोलस पूरन ९ धावांवर बाद झाला. स्टॉयनिसह १३ धावांवर तंबूत परतला. स्टॉयनिस याने १३ धावांचे योगदान दिले. कृष्णाप्पा गौतम याने लखनौकडून सर्वाधिक २३ धावांचे योगदान दिले. गौतम याने दोन षठकार आणि एक चौकार लगावला. रवि बिश्नोई पाच धावांवर बाद झाला. अमित मिश्रा आणि नवीन उल हक यांनी अखेरच्या षटकात भागिदारी केल्यामुळे लखनौचा संघ १०० धावसंख्या ओलांडू शकला. अमित मिश्रा याने १९ धावांचे योगदान दिले. तर नवीन उल हक याने १३ धावा चोपल्या. लखनौच्या एकाही फलंदाजाला तीस धावसंख्येचा टप्पा ओलांडता आला नाही.
आरसीबीकडून कर्ण शर्मा आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, वानंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. लखनौचे दोन फलंदाज धावबाद झाले.
अमित मिश्राची झुंजार खेळी
लखनऊकडून कृष्णप्पा गौतमने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यानंतर अमित मिश्राने 19 धावांची झुंजार खेळी केली. तर कृणाल पंड्याने 14, मार्कस स्टॉयनिस व नवीन-उल-हकने प्रत्येकी 13 धावा केल्या. बंगळुरूकडून जोश हेझलवूड आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.