(करिअर)
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 13 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने स्केल II आणि स्केल III मध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी गुरुवार 13 जुलैपासून Bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2023 आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट बँक ऑफ महाराष्ट्र मधील एकूण 400 रिक्त पदे भरण्याचे आहे त्यापैकी 100 रिक्त पदे अधिकारी श्रेणी III साठी आहेत आणि 300 रिक्त पदे अधिकारी श्रेणी II साठी आहेत.
एकूण रिक्त जागा : 400
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर स्केल III 100
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
2) ऑफिसर स्केल II 300
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव
परीक्षा फी – जनरल/ओबीसी//EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]
पगार-
ऑफिसर स्केल III :- 63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230
ऑफिसर स्केल II :- 48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810
अर्ज फी- या पदांसाठी UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC/ST उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क रुपये 118 आहे. शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत साइट पाहू शकतात.
वय श्रेणी- स्केल II साठी 31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय किमान 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे आणि स्केल III साठी 25 ते 38 वर्षे असावे, असे निश्चित करण्यात आले आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठीही उच्च वयाची सूट लागू आहे.
अनुभव- स्केल 2 अधिकारी पदासाठी तीन वर्षांचा अनुभव आणि स्केल 3 अधिकारी पदासाठी 5 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीसाठी गुणांचे वाटप 150 आणि 100 आहे जे 75:25 मध्ये रूपांतरित केले जाईल. निवडलेले उमेदवार सामील झाल्याच्या तारखेपासून 02 वर्षांच्या बाँडवर स्वाक्षरी करतील. तसेच निवडलेले उमेदवार 06 महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीवर असतील.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ – bankofmaharashtra.in