( लांजा / वार्ताहर )
बँक ऑफ इंडियाचा ११८ वा वर्धापन दिन लांजा तालुक्यातील साटवली या ग्रामीण शाखेत विविधांगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी सुरुवातीला बँक ऑफ इंडियाच्या विविध ग्राहकाभिमुख योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी बँकेच्या या साटवली शाखेचे व्यावसायिक श्रेणीतील अव्वल ग्राहक रहीमशेठ रखांगी आणि शाखा व्यवस्थापक भरत सिंग यांच्या हस्ते केक कापून बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बँकेला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना रहीमशेठ रखांगी यांनी मनोगतात सांगितले की, या बँकेच्या माध्यमातून साटवली सारख्या ग्रामीण भागात भविष्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवावेत. जेणेकरून बँक आणि येथील जनता यांच्यात आपुलकीचं आणि आत्मीयतेचे नाते निर्माण होईल. यांनतर बँकेचे शाखा व्यवस्थापक भरत सिंग यांच्या हस्ते उपस्थित ग्राहकांचे विशेष स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक भरत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपव्यवस्थापक अंकुश खरात, कर्मचारी विशाल गायकवाड, सतीश कुमार, शिपाई कृष्णा शेलार, निनाद शेरे यांनी मेहनत घेतली.