आजकाल असे अनेक स्मार्टफोन वापरकर्ते आहेत, जे त्यांच्या फोनशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या फोनला फार सांभाळून ठेवतात. पण सध्या पाऊस सुरु झाला आहे. पावसात सगळीकडेच पाणी पाणी असतं. फोनमध्ये जरा जरी पाणी गेलं तर तो खराब होतो. त्यामुळे साहजिकच खर्चही होऊ शकतो. जर तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला असेल तर काही टिप्स अवलंबून तुम्ही तुमचा फोन खराब होण्यापासून वाचवू शकता. जर पाण्याचा एक थेंब स्मार्टफोनमध्ये गेला तर ते काम करणे थांबवू शकते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही पावसाळ्यात बाहेर जाल, तेव्हा तुमचा स्मार्टफोन काळजीपूर्वक ठेवा. यानंतरही जर तुमचा मोबाईल पाण्यात भिजला असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमचा स्मार्टफोन पावसाच्या पाण्यात ओला झाला असेल तर या ट्रिक्स नक्की वापरून पहा.
पहिल्यांदा फोन बंद करा
तुमचा मोबाईल भिजला असेल किंवा पाण्यात पडला असेल तर तो लगेच बंद करा. फोन ऑन करण्याची चूक करू नका. जर पाण्याचा थेंबही फोनमध्ये गेला तर ते चिपमधील सर्किट्स एकमेकांशी जोडून खराब करू शकतात. तुमच्या फोनमध्ये स्पार्किंग देखील होऊ शकते. फोनला जोडलेल्या अॅक्सेसरीज ताबडतोब काढून टाका.
फोन कोरडा करण्यासाठी ही चूक करू नका
अनेकदा लोक फोन सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात. परंतु, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे फोनच्या चिपमधील पाणी कोरडे होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. फोन सुकविण्यासाठी सूर्यप्रकाश (थेट सूर्यप्रकाश नाही) किंवा पंख्याची हवा वापरा.
ओलावा असेल तर काय करावे?
अनेकदा फोन हवेत किंवा उन्हात ठेवल्यास फोनमधील पाणी सुकते, पण ओलावा कायम राहतो. अशावेळी कोणत्याही हार्डवेअर किंवा केमिस्टकडून पाणी शोषणारे कापड घ्या. त्यात फोन गुंडाळून ठेवा. ते किमान दोन दिवस ठेवावे. मोबाईलच्या ऑडिओ जॅकमध्ये तांदूळ जाणार नाही याची खबरदारी घ्या. काही लोक तांदळात फोनचा ओलावा सुकवण्यासाठीही ठेवतात. फोन एका भांड्यात किंवा डब्यात दिवसभर ठेवा. तांदळात ओलावा शोषण्याचे पूर्ण गुणधर्म आहेत.
पूर्ण कोरडे झाल्यानंतरच पुन्हा चालू करा
फोन पूर्णपणे कोरडा झाल्यावरच तो पुन्हा चालू करावा. या सर्व टिप्स अवलंबल्यानंतरही फोन कोरडा असल्याची खात्री करा. त्यानंतर फोनमध्ये सिम टाका. ते चालू करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल, तर नक्कीच तपासा. कधीकधी मदरबोर्डवरील ओलाव्यामुळे स्क्रीन व्यवस्थित काम करत नाही.
फोन ओला झाला असेल तर नॅपकिनने स्वच्छ करा. त्यानंतर, सिम कार्ड काढा आणि टिश्यू पेपरने स्वच्छ करा. जर तुम्ही घरी असाल तर ताबडतोब तुमचा फोन 24 तास कच्च्या तांदळामध्ये ठेवा. जर तुम्ही बाहेर असाल तर ते टिश्यू पेपरने रॅप करा. हे फोनमध्ये असलेले एक्स्ट्रॉ मॉइश्चरायझर शोषण्याचे काम करते. यासाठी तुम्ही भरपूर टिश्यू पेपर घ्या आणि त्यात तुमचा फोन रॅप करा.
हेअर ड्रायरने वाळवण्याची चूक करू नका जेव्हा घरी काम करत असताना स्मार्टफोन पाण्यात जातो, तो बाहेर काढण्याची आणि हेअर ड्रायरने सुकवण्याची चूक करू नका. असे केल्याने स्मार्टफोनमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्सचे नुकसान होऊ शकते. याशिवाय, ते सुकविण्यासाठी नैसर्गिक मार्ग निवडा, जसे कच्चा तांदूळ, ब्लॉटिंग पेपर किंवा सूर्यप्रकाश. तसेच जर तुम्ही तुमचा फोन ओपन केल्यानंतर सर्व गोष्टी उन्हात सुकवत असाल तर लक्षात ठेवा की ते एका तासापेक्षा जास्त काळ ठेवू नका. असे केल्याने स्मार्टफोनच्या प्लास्टिक भागांचे नुकसान होऊ शकते.
स्मार्टफोन ओला झाला, तर लगेच चार्जिंग लावू नका. असे केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकते ज्यामुळे फोन पूर्णपणे खराब होईल. बऱ्याच वेळा लोकांच्या या चुकीमुळे फोन पूर्णपणे खराब होतो, जो ठिकही करता येत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की स्मार्टफोन पाण्यात भिजल्यामुळे व्यवस्थित काम करत नाही, तर ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन चेक करा.