फेसबुकवर मैत्री झालेल्या एका तरुणाने २६ वर्षीय विवाहितेला एका लॉजवर भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या महिलेचे नकळत अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून त्यावरून वेळो-वेळी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी संबंधित पिडितेने थेट पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती. अखेर पोलीसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.
अतुल इंदलकर (वय २५, रा.हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ यादरम्यान घडली. पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, या महिलेची फेसबुकवरुन आरोपीशी ओळख झाली. अतुल इंदलकर याने या महिलेस हांडेवाडी येथे एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन तिचे अर्धनग्न फोटो काढून ते पतीला व नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला वारंवार भेटण्यास बोलावून जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तिला मारहाण केली. अखेर या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांत धाव घेतल्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.