(फुणगूस/इकबाल पटेल)
फुणगूस खाडीभाग परिसराला चार दिवस झोडपून काढणाऱ्या पावसामूळे सर्वत्र पूरपरिस्थिती व जलमय परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवनही विस्कळीत झाले होते. मात्र गुरुवारी रात्री पासून पावसाने थोडी फार उसंती घेतल्याने पुराचे पाणी ओसरून पाण्याने नेहमीची पातळी गाठली. शुक्रवारी सकाळ पासून अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी व मध्येच ऊन या ऊन आणि पावसाच्या खेळात जा,ता,ना,ही,पा,नि,पी असे आपसूकच मुखातून शब्द बाहेर पडतात ते सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मनमोहक दर्शन खाडीभागवासीयांना झाले आणि हे मनमोहक असे दृश्य पाहण्यासाठी व आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
हिरवा शाळू नेसलेला खाडीपरिसर दाट गडद हिरवाईने दाटलेला चोहू बाजूचा डोंगर व त्या मधून पाण्याने खळ-खळ वाहणारे नदी-नाळे दोन गावांमधून वाहणारी खाडी अशा निसर्गाने नटलेल्या फुणगूस खाडीभाग परिसरात शुक्रवारी ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असताना सप्तरंगी इंद्रधनुष्याने सप्तरंगाची उधळण करत अचानक आगमन केले. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी व आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात मनमोहक वाटणारे विलोभनीय दृश्य कैद करण्यासाठी डिंगणी-फुणगूस पुलावर एकच गर्दी झाली झाली होती.तर या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक व प्रवाश्यांनीही थांबून आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात विलोभनीय मनमोहक दृश्य टिपण्यास गर्दी केली होती.
(मनमोहक सप्तरंगी इंद्रधनुष्याचे दृश्य टिपले आहे पत्रकार इकबाल पटेल यांनी)