(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील फुणगुस येथे शेती व्यवसायाला कंटाळून प्रौढाने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली आहे. शंकर नारायण पांचाळ (वय ५८, रा कडेवठार कुंभार माळा) हे दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता घरात काही ही न सांगता निघून गेले.मात्र बराच वेळ झाल्यावर ही ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे मुलाने पोलिस स्थानकात वडील हरवल्याची तक्रार दिली.
यामध्ये त्याने असे सांगितले की,.वडिलांना दारू पिण्याचे व्यसन होते. आणि त्यांच्यावर सुमारे ८ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा आजार असल्याने अँजिओग्राफी करण्यात आली होती. ते नेहमी शेतीचा कंटाळा आल्याचे नेहमी घरात सांगत असत. आपले वडील दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी घरातून बाहेर पडले ते अद्याप घरी परतले नाहीत. त्यांचा मुलगा आणि चुलते अशोक पांचाळ यांनी शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दि.२६ ऑगस्ट रोजी फुणगुस कडेवठार कुंभार माळा येथील विहिरीजवळ मयत शंकर पांचाळ यांची पँट, छत्री, टोपी, चप्पल दिसून आली.
दरम्यान वाडीतील सुनील घेवडे, तंटामुक्त अध्यक्ष सुरेंद्र लांजेकर,शेखर देसाई, पोलिस पाटील विजय शिंदे, साहीम खान यांनी विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवरूख येथील हेल्पलाईन सदस्यांना बोलावले. त्यांनी त्याच्याकडील गळ टाकून विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. विहिरीतील मृतदेह आपल्याच वडिलांचा असल्याचे मुलाने सांगितले. त्यांनी शेती व्यवसायाला कंटाळून विहिरीत उडी मारून जीवन संपवले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयत शंकर पांचाळ यांचा मृतदेह संगमेश्वर शासकीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी नेण्यात आला असून तिथे डॉक्टर रायभोले यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले.