(क्रीडा)
आशिया कपच्या फायनल अगोदर सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. श्रीलंकेने टॉस जिंकत पाकिस्तानला बॅटींगसाठी आमंत्रित केलं होतं, मात्र पाकिस्तानचा संघ श्रीलंकेसमोर अवघ्या 121 धावात ऑल आऊट झाला. यामध्ये बाबर आझम 30 आणि मोहम्मद नवाझ यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या.
आशिया कप २०२२ फायनलच्या ड्रेस रिहर्सल सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला आहे. खरे तर हे दोन्ही संघ आधीच फायनलमध्ये पोहोचले आहेत. दोन्ही संघ उद्या ११ सप्टेंबरला फायनलमध्ये पुन्हा भिडणार आहेत. श्रीलंका पाच वेळा चॅम्पियन आहे, तर पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे.
तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर १२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रींलकेने १७ षटकातंच लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक ५५ धावा केल्या. दरम्यान, पाकिस्तान संघावर या पराभवामुळे काही प्रमाणात दडपण राहण्याची शक्यता आहे. आशिया चषक 2022चा अंतिम सामना उद्या रविवारी (11 सप्टेंबर) खेळवला जाणार आहे.