(नवी दिल्ली)
पंजाब पोलिसांकडून खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या अटकेसाठी देशभरात सर्च ऑपरेशन केले आहे. मात्र आता अमृतपाल हा पंजाबमध्ये परतला असून तो आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फरार अमृतपाल सिंग सरेंडर होण्याच्या चर्चेच्या दरम्यान अमृतसर ग्रामीण पोलिसांनी बुधवारी ‘ह्यू एंड क्राई’ नोटीस जारी केली आहे. या नोटीसीचा उद्देश्य असतो की, आरोपीला पकडण्यासाठी सामान्य जनतेने मदत करावी. नोटीसमध्ये म्हटले आहे की, अमृतपाल सिंग संधू तरसेम सिंग यांचा मुलगा आहे, जो जल्लूपूर खेरा येथील निवासी आहे. तो अमृतसर (ग्रामीण) पोलिसांचा वॉन्टेड आरोपी आहे.
नोटीसमध्ये लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणालाअमृतपाल यांच्याविषयी माहिती मिळाल्यास ते पोलिसांशी संपर्क करू शकतात. यासाठी पोलिसांनी संपर्क क्रमांक दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की,अमृतपाल सिंग १८ मार्चपासून फरार आहे.
पंजाब पोलिसांकडून खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगयाच्या अटकेसाठी देशभरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाब पोलिसांच्या या सर्च ऑपरेशनसाठी अनेक राज्यातील पोलीस मदत करत आहेत. दरम्यान अमृतपाल हा पंजाबमध्ये परतला असून तो आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.