( रत्नागिरी )
तालुक्यातील फणसोप येथील मनोरुग्ण महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी 12.30 ते सायंकाळी 5 या वेळेत घडली. विनया विजय भारती (४०, रा. जुईवाडी, फणसोप) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या २०१८ पासून मानसिक रुग्ण असून त्यांच्यावर प्रादेशिक मनोरुग्णालयातून उपचार सुरू होते.
शनिवारी त्यांनी फणसोप जुईवाडी चिमट्याची खोंड येथे बांधकाम सुरू असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांना पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.