(लांजा)
लंडनस्थित सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब या कंपनीने सर्क्युलर इकॉनॉमी इकोसिस्टिमला चालना देण्यासाठी लांजातील युवा शेतकरी तथा ‘फणसकिंग’ मिथिलेश देसाई यांच्या कंपनीशी नुकताच सामंजस्य करार केला.
कृषी प्रतिमानांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. टाकाऊ आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी ही कंपनी समर्पित आहे. मिथिलेश देसाई यांना भारतासाठी ब्रँड ॲ्बेसिडर जबाबदारी देण्यात आली आहे.
मिथिलेश देसाई यांनी जगभरातील ८६ वैविध्यपूर्ण फणस वाणांवर केलेल्या संशोधनात्मक कामगिरीमुळे त्यांना जागतिक मान्यता मिळाली आहे. त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने ‘कृषी गौरव पुरस्कार’ दिला.
सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हबचे संस्थापक जोएल मायकल यांनी यावेळी सांगितले की, मिथिलेश देसाई यांच्यासोबतची आमची भागीदारी भारतातील कृषी प्रतिमानांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आहे. याचा नक्क्कीच फायदा होईल.