भारताने नुकतीच चंद्रावर चांद्रयान 3 मोहीम यशस्वीपणे राबवली. याच चंद्राविषयी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चंद्रावर सुमारे 1.1 मिलियन टन हेलियम -3 असू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण करून भारताने इतिहास रचला. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. चांद्रयानच्या रोव्हर ‘प्रज्ञान’ने चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियम यासारख्या गोष्टी शोधल्या आहेत. पण, चंद्रावर अशी एक गोष्ट आहे, ज्यातील फक्त 1.5 ग्रॅम महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला एका दिवसासाठी ऊर्जा पुरवण्यासाठी पुरेसे आहे. तर सुमारे 50 ग्रॅम संपूर्ण महिनाभर ऊर्जा देऊ शकते. 30 टनांसह संपूर्ण देशाला वर्षभर ऊर्जा मिळू शकते. ती गोष्ट म्हणजे हेलियम-3. शास्त्रज्ञांच्या मते, हेलियम 3 हे हिलायन, हिलियमचा एक स्थिर आयसोटोप आहे, ज्यामध्ये न्यूट्रॉनपेक्षा जास्त प्रोटॉन आढळतात.
चिनी स्पेसक्राफ्ट Change ने 2022 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरुन माती आणली होती. जेव्हा शास्त्रज्ञांनी या मातीवर संशोधन केले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. चंद्राच्या मातीत हेलियम-3 आढळले. शास्त्रज्ञांच्या मते, फक्त एक ग्रॅम हेलियम-3 165 मेगावॅट तास वीज निर्माण करू शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हेलियम 3 स्वच्छ ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत बनू शकतो. हेलियम 3 कोणतेही रेडिएशन सोडत नाही किंवा कचरा निर्माण करत नाही.
हेलियम-3 ही पृथ्वीवरील सर्वात महागड्या वस्तूंपैकी एक आहे. एक किलोग्रॅम हेलियम-3 ची अंदाजे किंमत 1.5 मिलियन डॉलर्सपर्यंत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रावर सुमारे 1.1 मिलियन टन हेलियम-3 असू शकते, जे पुढील 10 हजार वर्षांसाठी संपूर्ण जगाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपली मोहीम ज्या भागात पाठवली आहे त्या भागात हेलियम 3 चे प्रमाण सर्वाधिक असणे अपेक्षित आहे. मात्र, चंद्रावर हेलियम-3 खाण करून पृथ्वीवर आणणे हे मोठे आव्हान आहे. शास्त्रज्ञांच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत हे स्वप्न साकार होऊ शकते.